नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर ईडी कार्यालयाजवळ बेकायदेशीर पणे निदर्शने करणे, आरोपींना मदत होईल अशा दृष्टीने वागणे या संदर्भात वकील अॅड. जयश्री पाटील यांनी एआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तक्रार केली आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेवेळी देखील या सरकारने असंच केलं होते असं त्या यावेळी म्हणाल्या. आमची हत्या झाल्यास हे सरकार जबाबदार असेल असं ही त्या यावेळी म्हणाल्या.